छावनी परिषदेच्या विद्यार्थीनींनी शिष्यवृत्ती परिक्षेत मिळविलेले यश शाळेच्या लौकिकात भर टाकणारे- मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार

अहमदनगर – राज्य परिक्षा परिषद आयोजित पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत छावनी परिषद शाळेच्या विद्यार्थीनींनी मिळविलेले यश शाळेच्या लौकिकात भर टाकणारे आहे, असे प्रतिपादन छावनी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी केले. शिष्यवृत्ती परिक्षेत शहरी विभागातून गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थींनी कु.आकांक्षा विठ्ठल परदेशी व कु.श्रावणी अशोक शेलार तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा शाळेच्यावतीने आयोजित सत्कार कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.

कोविड कालावधी असतानासुद्धा शाळेतील शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे जे यश प्राप्त झाले ते निश्चित कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन बुर्‍हाणनगर केंद्राच्या केंद्रप्रमुख सुनंदा शिंदे यांनी अध्यक्षपदावरून बोलताना केले. कार्यक्रमास छावनी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, छावनी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड, बुर्‍हाणनगर केंद्राच्या केंद्र प्रमुख सुनंदा शिंदे, शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष विनय महाजन, प्रभारी मुख्याध्यापक संजय शिंदे,राजेंद्र भोसले, मुबीना शेख यांसह पालक उपस्थित होते. स्वागत सुभाष भारूड, सुत्रसंचालन संध्या पाटकुळकर यांनी तर आभार स्नेहल लवांडे यांनी मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा