‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ ही म्हण सार्थ करुन जिवाजी महालेंच्या पराक्रमाची इतिहासात नोंद-जिल्हाध्यक्ष योगेश पिंपळे

जिवा सेनेच्यावतीने जिवाजी महालेंचा स्मृतीदिन साजरा

(छाया – विजय मते,अहमदनगर)

अहमदनगर- स्वत:च्या जीवावर उदार होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे अंगरक्षक म्हणून अफजलखानाचा अंगरक्षक सय्यद बंडाला यमसदनात पाठवून शिवरायांचे प्राण वाचविले. अशा या जिवाजी महालेच्या चपळाईचे कौतुक स्वत: शिवाजी महाराजांनी केले. ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ ही म्हण सार्थक झाली आणि जिवाजी महालेंच्या पराक्रमाची इतिहासात नोंद झाली, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष योगेश पिंपळे यांनी केले. नगर-मनमाड रोडवरील शिवरत्न जिवबा महाले चौकात जिवबा महाले यांच्या स्मृती दिनानिमित्त फलकास पुष्पहार अर्पण करुन जिवा सेना संघटनेच्यावतीने त्यांची प्रतिमा समाज बांधवांनी भेट देण्यात आली. याप्रसंगी वनिता बिडवे, रमेश बिडवे, आशिष ताकपिरे, कांचन बिडवे, स्वाती पवळे, शहाजी कदम, गंगाधर पंडित, शाम पिंपळे, राजेश सटाणकर व समाज बांधव उपस्थित होते.

श्री.पिंपळे पुढे म्हणाले, जिवबा महाले दानपट्टा चालविण्यात तरबेज होते. महाराजांवर वार करतांना सय्यद बंडाचा वार जिवाने आपल्या अंगावर घेत चपळाईने सपकन घाव घालून सय्यद बंडाच्या चिरकाळ्या केल्या. त्यांच्या या चपळाईचे शिवारायांनी कौतुक केले. सुरतेच्या स्वारीतही जिवाजीनी महाराजांना वाचविले अशा शूरवीरांचा इतिहास विसरता कामा नये. प्रास्तविकात रमेश बिडवे यांनी प्रताप गडावरील रणसंग्राम प्रसंगी शिवछत्रपतींनी अफजल खानाची आतडी बाहेर काढली; जिवाजी महालेंच्या निष्ठेमुळेच अफजल खानासारखा गिधाड व कृष्णाजी भास्करसारख्या देशद्रोही सहज संपविला, असे सांगून त्यांच्या पराक्रमाची माहिती दिली. राजेश सटाणकर यांनी जिवाजी महाले यांच्या स्मृतीदिनी तीन वर्षापुर्वी प्रेमदान चौकाचे ‘जिवबा महाले चौक’ नामकरण केले. त्याच्या स्मारकासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता या चौकाची ओळख जिवबा महाले नावानेच होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन आशिष तापकिरे यांनी केले तर स्वाती पवळे यांनी आभार मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा