तोफखाना आरोग्य केंद्रावर डॉक्टरांसाठी बुस्टर डोसचे लसीकरण

अहमदनगर – गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे महाभयंकर संकट मानवी जीवनावर ओढवले आहे.नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना केल्या जात आहे. नागरिकांना योग्य उपचार मिळावे यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका आदीसह विविध कर्मचार्‍यांनी आपली भूमिका सक्षमपणे पार पाडली आहे. आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी आरोग्य सेवेला प्राधान्य क्रम दिले. लसीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेची हमी मिळाली आहे. डॉक्टर दररोज कोविड रुग्णांवर उपचार करत आहेत डॉक्टरांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी त्यांना बुस्टर ढोसची आवश्यकता आहे यासाठी माजी उपमहापौर मालनताई ढोणे यांनी माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनपा तोफखाना आरोग्य केंद्र येथे डॉक्टरांच्या बुस्टर ढोसच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ.गोपाळ बहुरूपी, नगरसेवक प्रदीप परदेशी, संजय ढोणे, अजय ढोणे, प्रताप परदेशी, कल्पेश परदेशी, अभिजीत ढोणे आदींसह नागरिक उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा