बास्केटबॉल संघात निवड झालेल्या दिशान गांधी व हर्षल सेलोत यांचा जितो अहमदनगरतर्फे सत्कार गुणी खेळाडूंना जितोकडून उत्तेजन व प्रोत्साहन मिळेल-गौतम मुनोत

अहमदनगर – क्रीडा क्षेत्रात करियरच्या अनेक चांगल्या संधी आहेत. ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचे देशभरात झालेले कौतुक सर्वांनीच पाहिले आहे. त्यामुळे मुलांना अभ्यासाबरोबरच खेळासाठीही प्रोत्साहन दिले पाहिजे. दिशान गांधी व हर्षल सेलोत यांची आंतरविद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात निवड होणे हे नगरसाठी अभिमानास्पद आहे. अशा गुणी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जितो नेहमीच सहकार्य करेल, अशी ग्वाही जितोचे रेस्ट ऑफ महाराष्ट्रचे जॉइंट सेके्रटरी गौतम मुनोत यांनी दिली. अहमदनगरच्या पेमराज सारडा कॉलेजचे खेळाडू दिशान गांधी व हर्षल सेलोत यांची पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात निवड झाली आहे. या कामगिरीबद्दल त्यांचा जितो अहमदनगरच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जितो अहमदनगरचे चेअरमन अमित मुथा, सेके्रटरी प्रितेश दुगड, गौतम मुथा, आलोक मुनोत, केतन मुनोत, महेश मुथियान, दिनेश ओसवाल, ऍड.कृष्णाली सेलोत, किशोर गांधी आदी उपस्थित होते.

अमित मुथा म्हणाले की, जितो अहमदनगरमार्फत समाजातील गुणी खेळाडूंना विविध स्पर्धांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे. दिशान गांधी व हर्षल सेलोत यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद असून आमच्या उपक्रमात नवोदितांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचे सहकार्य घेतले जाईल. दिशान प्रतिभावान खेळाडू असून त्याने मागील वर्षी चंद्रपूर येथील आंतर विद्यापीठ कॉपीबॉल स्पर्धेतही कांस्यपदक व शिष्यवृत्ती मिळवली होती. त्याच्याच नेतृत्त्वाखाली बास्केटबॉल स्पर्धे त सारडा कॉलेजने नगर विभागात अजिंक्यपद पटकाविले होत तसेच नंतर ग्रुप स्पर्धेत नगरने नाशिक व पुणे शहर संघाचा पराभव केला. यात केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे गांधी व सेलोत यांची विद्यापीठ संघात निवड झाली आहे. आंतरविद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धा लवकरच जिवाजी विद्यापीठ, ग्वालियर(मध्य प्रदेश) येथे होणार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा