एडीएचडी काय आहे?

ॲटेंशन डेफिसिट हायपरऍक्टिव्ह डिसऑर्डर’ (एडीएचडी) हा मुलांमध्ये आढळणारा मेंदूशी संबंधित सर्वसाधारण विकार आहे. शाळकरी मुलांमध्ये ही समस्या दिसून येते. एडीएचडी हा मानसिक आजार आहे. शाळकरी वयातल्या मुलांमध्ये हा विकार होण्याची तीन ते पाच टक्के शक्यता असते. मुलांच्या वागणुकीवर आणि सर्वांगिण विकासावर परिणाम करणार्‍या या विकाराविषयी…

लक्षणं – एकाग्रतेचा लक्षणं अभाव, अतिक्रियाशील असणं, वागण्यात उतावळेपणा जाणवणं ही एडीएचडीची सर्वसाधारण लक्षणं आहेत. ही लक्षणं व्यापक आणि सर्वसाधारण परिस्थितीत व्यक्तीच्या वागणुकीवर परिणाम करणारी आहेत. कारणं –  एडीएचडीचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही पण जनुकीय तसंच वातावरणाशी संबंधित काही घटक या विकाराला कारणीभूत ठरतात, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. व्यक्तीच्या सर्वांगिण विकासावर एडीएचडीचे विपरीत परिणाम होतात. हा विकार जडलेली 25 टक्के मुलं एखाद्या इयत्तेत अनुतीर्ण होतात. या मुलांना एखाद्या इयत्तेत परत बसावं लागतं. एडीएचडीवर उपचार घेणं गरजेचं आहे. उपचारांअभावी ही मुलं शैक्षणिक तसंच इतर पातळ्यांवर सर्वसामान्य मुलांपेक्षा मागे राहतात.

उपचार – मानसोपचार, वागणूक व्यवस्थापन प्रशिक्षण आणि औषधांमुळे एडीएचडीवर नियंत्रण मिळवता येतं. मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने मुलांच्या वर्तनावर नियंत्रण मिळवता येतं तसंच आठ ते बारा आठवड्यांचं वागणूक व्यवस्थापन प्रशिक्षण घेता येतं. यात मुलांसोबत त्यांच्या पालकांनाही प्रशिक्षण दिलं जातं. उत्तेजना वाढवणार्‍या औषधांमुळे हा विकार बरा होऊ शकतो. गेल्या 60 वर्षांपासून एडीएचडीच्या उपचारांमध्ये या औषधांचा वापर केला जात आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा