खाद्य प्रेमी असूनही फिट!

अभिनेत्री क्रिती सेनॉन… राबता, बरेली की बर्फीसारख्या चित्रपटांमधून ती झळकली. उंच आणि आकर्षक क्रितीच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दिल्लीकर आणि त्यातही पंजाबी असल्याने तिला खाण्या-पिण्याची प्रचंड आवड आहे. दाल मखनी, पिझ्झा, पास्ता असे पदार्थ ती आवर्जून खाते. फास्ट फूड आणि उच्च कॅलरीयुक्त पदार्थ खाऊ नही तिने फिटनेस टिकवून ठेवला आहे. आहार आणि फिटनेस यांचं संतुलन तिने कसं साधलं आहे याविषयी…

क्रिती खाद्यप्रेमी असली तरी प्रमाणाबाहेर खाणं टाळते. एखाद्या वेळी नेहमीपेक्षा जास्त खाल्लं तर ती व्यायामाचं प्रमाण वाढवते.

संतुलित आहार घेणं, भरपूर पाणी पिणं आणि नियमित व्यायाम करणं हे तिच्या फिटनेसचं रहस्य आहे.

क्रितीला एकाच प्रकारच्या व्यायामाचा कंटाळा येतो. त्यामुळे ती विविध व्यायामप्रकार करते. जिममध्ये जाण्यासोबतच ती नृत्यही करते. पिलेट्स हा सुद्धा तिचा आवडता व्यायामप्रकार आहे.

व्यायाम करताना मोकळेढाकळे कपडे घालण्यावर तिचा भर असतो. जीन्स घालून आपण व्यायाम करू शकत नाही. त्यामुळे आरामदायी कपडे आणि बूट घालून व्यायाम करायला हवा, असं ती सांगते.

पादत्राणांचा स्नीकर्स हा प्रकार आवडत असल्याचं तिचं म्हणणं आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा