नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेतील ठेवी परत करण्यासाठी संचालकांनी प्रयत्न करावेत

अहमदनगर-नगर अर्बन को-ऑप.बँकेवर 6 डिसेंबर 2021 पासून रिझर्व्ह बँकेने निबंध लागू करुन जनतेच्या ठेव रकमा परत करणेबाबत बंदी केल्यामुळे अनेक गोरगरीबांना मोठ्या आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. दिवसभर काबाडकष्ट करून पै पै गोळा करुन नगर अर्बन बँकेत मोठ्या विश्वासाने रकमा गुंतवलेल्या आहे. शंभर वर्षापेक्षा जास्त काळापासून हि बँक अस्तित्वात असल्यामुळे नगरकरांनी भरोसा ठेवून रकमा गुंतवलेल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या या निबंधामुळे त्यांचा बँकेवरील विश्वासाला तडा बसलेला आहे. नवनियुक्त संचालकांनी त्यांच्या सर्व शाखेतील कर्ज थकबाकी रकमा वसुली करण्यास युध्दपातळीवर प्रयत्न करून गोरगरीब व तळागाळातील जनतेने गुंतविलेल्या रकमा परत मिळवून देणेसाठी प्रयत्न करुन जनतेकडून गमावलेला विश्वास व भरोसा पुन्हा मिळवावा अशी मागणी सहकारी पतसंस्था अन्याय निवारण समन्वय समितीचे अध्यक्ष सुहास मोहोरकर यांनी या पत्राद्वारे केली आहे.

या बँकेचे अहमदनगर जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणावर शाखा असून त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. विशेषतः गोरगरीबांनी पतसंस्थेच्या माध्यमातून गुंतवलेल्या रकमा सुध्दा मोठ्या प्रमाणावर आहेत. तळागाळातील अनेक घटक वर्गातील लोकांनी पतसंस्थेत ठेवीच्या स्वरुपात रकमा ठेवलेल्या आहेत. त्याच रकमा अनेक पतसंस्थांनी नगर अर्बन बँकेत गुंतवलेल्या आहेत. या निर्बंधामुळे पतसंस्था मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची दाट शक्यता आहे असे मत मोहोरकर यांनी व्यक्त केली. गोरगरीब जनतेने अनेक सहकारी पतसंस्थेत गुतवलेले पैसे पुन्हा परत देणेबाबत नगर अर्बन बँकेच्या नुतन संचालकांनी प्रयत्न करावा, या कामी जनतेचे सहभाग व सहकारी, काम हाती घ्यावे. तसेच ज्या पतसंस्थेच्या रकमा अडकलेल्या असतील त्यांच्या संचालकांशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी समजावून घ्यावे आणि त्यासाठी उपाययोजना करुन मार्ग काढावा, अशी अपेक्षा मोहोरकर यांनी व्यक्त केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा