एमआयडीसीत कंपनीतून चोरी करताना कामगाराला पकडले

अहमदनगर- एमआयडीसीतील कंपनीत काम करणार्‍या कामगाराने कंपनीतील साहित्याची चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला सदर साहित्य चोरुन नेत असताना पकडण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसीतील सी.जी. पॉवर ऍण्ड इंडिस्ट्रीज् सोल्यूशन प्रा.लि. या कंपनीत काम करणारा कामगार किरण प्रभाकर डागवाले (वय 31, रा.आंधळे-चौरे नगर, वडगाव गुप्ता रोड) याने बुधवारी (दि.12) दुपारी 3.20 च्या सुमारास कंपनीतून 2 हजार रुपये किंमतीचे 2 कॉपर वायरचे बंडल चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी पकडले. त्यानंतर कंपनीचे अधिकारी नितीनकुमार रघुनाथ वट्टमवार (रा.एकवीरा चौक, पाईपलाईन रोड) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात किरण डागवाले विरुद्ध फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भा.दं.वि.क. 381 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा