उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांमुळे अहमदनगरसह राज्यात थंडीची लाट

मुंबई – राज्याच्या काही भागांत हवेतील बाष्पाचे कमी झालेले प्रमाण आणि त्याच वेळी उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यामध्ये झालेली वाढ, या कारणांमुळे थंडीचा कडाका वाढला असून आगामी दोन दिवस थंडीची तीव्रता टिकून राहील, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. सध्या देशाच्या उत्तरेकडील पंजाब, काश्मीर, हरियाणा, चंदीगड, राजस्थान, दिल्ली येथे थंडीची तीव्र लाट आली आहे. काही राज्यांत बर्फवृष्टीही सुरू आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍याचा प्रभाव राज्यात जाणवत असून थंडीची लाट आली आहे. राज्यात बुधवारी (दि.12) सकाळी महाबळेश्वर येथे सर्वांत कमी 9.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्या पाठोपाठ बुलढाणा 10, जळगाव येथे 12.2, मालेगाव 12.2,अमरावती 13 तर नगर येथे 14 अंश तापमान नोंदवले गेले. राज्यात थंडीची तीव्रता उत्तर महाराष्ट्र, खानदेशात अधिक आहे. उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍याचा प्रभाव तीव्र असल्याने हवेतील बाष्प निघून गेले आहे. कोरड्या हवामानामुळे आकाशही निरभ्र झाले आहे. त्याचा परिणामही गारठा वाढण्यात झाला आहे. येत्या 48 तासांत हा प्रभाव टिकून राहण्याची शक्यता असल्याने आणखी 2 दिवस राज्यात थंडीचा कडाका जाणवेल, असा अंदाज वर्तवला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा