‘किल्ले रायगड’नंतर आता कुलाबा किल्ल्यावरही अनधिकृत मजार

सर्व गड-किल्ले अतिक्रमणमुक्त व्हायलाच हवेत; हिंदु जनजागृती समितीची कारवाईची मागणी

अहमदनगर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर नुकतेच काही धर्मांधांनी अनधिकृत प्रार्थनास्थळ निर्माण केले होते. जागृत हिंदूंनी आवाज उठवल्यानंतर ते हटवण्यात आले; मात्र अशाच प्रकारचे अनधिकृत बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे मुख्य केंद्र असलेल्या ‘कुलाबा किल्ल्या’वर देखील झाल्याचे उघड झाले आहे. या किल्ल्यावर अनधिकृत मजार उभारण्यात आली असून तिला पांढरा रंग देण्यात आला आहे. बेकायदेशीर बांधकामांद्वारे हे भूमी हडपण्याचे एक तंत्र असून हे बांधकाम तात्काळ हटवावे आणि संबधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ’हिंदु जनजागृती समिती’ आणि ’राजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभाग’ यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण मुंबई विभाग, तसेच मुंबई आणि रायगड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे. यावेळी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या साहाय्यक पुरातत्त्व शास्त्रज्ञ श्रीमती फाल्गुनी काटकर यांनी कुलाबा किल्ल्यावर आमचे अधिकारी जाऊन आले असून ते दोषींवर योग्य ती कारवाई करणार आहेत, असे आश्‍वासन दिले. यारवेळी भारतीय पुरातत्त्व विभागात समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक बळवंत पाठक, राजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभागाचे मुंबई अध्यक्ष रोशन जंगम- बेलसेकर आणि राहुल आस्कट यांनी, तर मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर आणि रायगडच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांना समितीचे सर्वश्री सतीश सोनार, मंजुनाथ पुजारी, सौ. विशाखा आठवले, अवधूत बने, गिरीश जोशी आणि उदय तेली यांनी निवेदन दिले.

कुलाबा किल्ल्यांवरील अतिक्रमणाविषयी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी काही दिवसांपूर्वीच तक्रार दाखल केली होती. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने ज्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे हे घडले, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे; तसेच राज्यातील सर्वच किल्ल्यांच्या ठिकाणी अशी अतिक्रमणे झाली आहेत का, याचा अहवाल शासनाला सादर करून ती अतिक्रमणे तत्काळ हटवण्याची प्रक्रिया चालू करावी, अशी मागणी केली. पुरातत्व खाते आणि प्रशासन यांनी हे अतिक्रमण न हटवल्यास हिंदु जनजागृती समिती या प्रकरणी राज्यभरात तीव्र आंदोलन छेडेल, अशी चेतावणीही समितीने दिली आहे. हिंदवी स्वराज्याचा कणा असलेले हे शेकडो गड- किल्ले राज्याचा ऐतिहासिक ठेवा आहे. असे असतांना अनेक किल्ल्यांवर धर्मांधांनी अनधिकृत बांधकामे, मजार, प्रार्थनास्थळे उभी करण्याचा घाट घातला आहे. राज्यातील सर्व गडकोट इस्लामी आक्रमणमुक्त व्हायलाच हवेत, असेही हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा