बा आणि बापू पुरस्कारांचे स्नेहालय संमेलनात वितरण

अहमदनगर- नोखाली (बांग्लादेश) येथील महात्मा गांधी आश्रमाचे संचालक राह नबाकुमार आणि बांगलादेश मधील मानवाधिकार कार्यकर्त्या तंद्रा बारूआ यांना वर्ष 2021 चे बा आणि बापू पुरस्कार 13 जानेवारी रोजी दिले जाणार आहेत. दुपारी 3 ते 6 या वेळेत केडगाव येथील स्नेहांकुर प्रकल्पात स्नेहालय परिवाराचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यात हे पुरस्कार दिले जाणार असल्याचे संजय हरकचंद गुगळे आणि राजीव गुजर यांनी सांगितले. प्रत्येकी 50 हजार रुपये आणि सन्मानपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप असते. तसेच पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि संस्थांना असलेले परिवाराचे सदस्य व्यक्तिगत सहयोग देतात. त्यांच्या कामाशी जोडून घेतात. यंदाच्या वर्षीपासून स्वर्गीय विशाल आहिरे युवा प्रेरणा पुरस्कार संस्था देणार आहे. गेली 5 वर्षे जगातील 46 देशात फिरून गांधी आणि बुद्ध यांच्या विचारांचा प्रचार पायी आणि सायकल वरून राशीन येथील नितीन सोनवणे या युवा अभियंत्याने केला त्याला हा 11 हजार रुपयांचा पुरस्कार दिला जाईल.

स्नेहालयात सर्वोत्कृष्ट काम करणार्‍या कार्यकर्त्यांना दरवर्षी स्वर्गीय प्रा. गोपालभाई गुजर सेवा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या वर्षी त्यासाठी फॅमिली बेस केअर, या उपक्रमाच्या समन्वयक मीनाक्षी पवार आणि चाईल्ड लाईन उपक्रमाचे शाहिद शेख यांना निवडण्यात आले आहे. यावेळी सद्भावना सायकल यात्रेच्या माहितीपटाचे विमोचन होणार आहे. पत्रकार भूषण देशमुख यांनी लेखन आणि संपादन केलेल्या प्रवास सद्भावनेचा या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन यावेळी होईल विश्व पदयात्री योगेश माथूरिया कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते आहेत. करोनामुळे प्रत्यक्ष कार्यक्रमास मर्यादित प्रवेश आहेत. परंतु झूम आणि फेसबुक द्वारे या कार्यक्रमात सर्व जण सहभागी होऊ शकतात. यासाठी संस्थेने खालील लिंक दिल्या आहेत.Live :- Snehalaya Facebook Page: https://www.facebook.com/ Snehalaya/

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा