सिटी केअर रूबी हॉस्पिटलमध्ये अँटीजेन टेस्ट मोफत-व्हेंटीलेटर बेडसह स्वतंत्र कोविड विभाग

अहमदनगर- तारकपूर परिसरातील सिटी केअर रूबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये कोरोनाची अँटीजेन टेस्ट पूर्णत: मोफत करण्यात येत आहे. याठिकाणी 17 व्हेंटीलेटर बेडसह स्वतंत्र स्पेशल कोविड विभाग कार्यान्वीत आहे. तज्ज्ञ डॉक्टर अमित आहाळे (एम.डी.मेडीसीन) यांच्या मार्गदर्शनाखाली येथे रूग्णांवर परिणामकारक उपचाराची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती डॉ. संदीप सुराणा यांनी दिली.

कोविड 19 च्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर सिटी केअर रूबी हॉल हॉस्पिटलने आपली आरोग्य यंत्रणा अधिक प्रभावी केली आहे. या ठिकाणी रूग्णांची अँटीजेन टेस्ट पूर्णत: मोफत केली जात आहे. कोविड रूग्णांवर शासकीय दरानुसार उपचार केले जात असून कुठल्याही प्रकारचे छुपे चार्जेस आकारले जात नाहीत. डॉ. अमित आहाळे यांच्यासह प्रशिक्षित स्टाफ, स्वतंत्र कोविड विभाग याठिकाणी कार्यरत आहे. कोविड 19 व्यतिरिक्त मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनी विकार, मेंदू विकार, अर्धांगवायू, सर्पदंश, विषबाधा, पेशीचे आजार, तापीचे आजार, डेंग्यु, मलेरिया, चिकनगुणियासह इतर आजारांवर याठिकाणी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चांगली उपचार सुविधा उपलब्ध आहे. सुसज्ज आयसीयु, ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, तपासणी मशीनरी याठिकाणी आहे. आतापर्यंत अनेक रूग्णांनी येथील उपचार सुविधेचा लाभ घेतला आहे. अधिक माहिती व रूग्णसेवेसाठी संपर्क 0241-2329105/06/07/08.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा