मराठा सेवा संघ, जिल्हा मराठा पतसंस्था व जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने अभिवादन जिजाऊंच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले – दिग्वीजय आहेर

अहमदनगर – राजमाता जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. जिजाऊंनी शिवरायांच्या मनात स्वराज्याची कल्पना जागवली. अन्यायाचा पर्दाफाश करण्यासाठी स्वतःचे स्वराज्य स्थापन करण्याचे महत्त्व त्यांना कळले. स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी शिवरायांवर नितांत श्रद्धा निर्माण केली. जिजाऊंच्याच प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. आजही समाजात काम करतांना स्त्रीयांचा आदर केला पाहिजे. राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा यासारख्या महिलांचे राष्ट्रनिर्मितीत मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या आदर्शवर काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांनी केले. मराठा सेवा संघ, जिल्हा मराठा नागरी सह.पतसंस्था व जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर, अति.आयुक्त डॉ.प्रदीप पठारे, तहसिलदार उमेश पाटील, उपायुक्त कुर्‍हे, कारागृह अधिक्षक शामकांत शेडगे, तालुका उपनिबंधक किसन रत्नाळे, किरण आव्हाड, सा.बां.विभागाचे इंजि.महाडिक, जिल्हा मराठा सेवा संघाचे सुरेश इथापे, राजेश परकाळे, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सतीश इंगळे, संचालक ज्ञानदेव पांडूळे, उदय अनभुले, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष संपुर्णा सावंत, शारदा पवार, वंदना निघुट आदि उपस्थित होते.

यावेळी शामकांत शेडगे म्हणाले, स्वराज्य निर्माण करण्यात मॉं जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे. फक्त मुघलांपासून रक्षण करणे एवढेच नव्हे तर, न्यायनिवाड्याची कामे, नेतृत्व कौशल्य आणि एक मुत्सद्दी राजकारणी हे गुण सुद्धा त्यांनी शिवबांना दिले. आज आपण शिवबांना ‘जाणता राजा’ संबोधतो ते केवळ आणि केवळ मॉं साहेबांनी राजांवर केलेल्या संस्कारांमुळे. त्यासाठी आपणही येणार्‍या पिढीवर चांगले संस्कार घडवून एक आदर्श पिढी निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. याप्रसंगी सुरेश इथापे म्हणाले, मराठा सेवा संघाच्यावतीने मॉंसाहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शावर काम सुरु असून, समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रमाद्वारे समाजोन्नत्तीचे काम सुरु असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश इंगळे यांनी केले तर आभार अशोक वारकड यांनी केले. यावेळी सुधीर शेटे, सचिन अकोलकर, इंजि.श्रीकांत निंबाळकर, मनोज पारखे, अमोल लहारे, केशव हराळ, अशोक कराळे, महादेव कोतकर, सतीश बनकर, भारत उमाप, विजय नवले, सतीश दारकुंडे, विजय बेरड, मानद सचिव राजेंद्र ढोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड, व्यवस्थापक बबन सुपेकर, शाखाधिकारी अनुपमा भापकर, प्रितेश बोरुडे, दिपमाला पवार, प्रशांत बोरुडे, शशिकांत बोरुडे, कविता ढोणे, राजेंद्र रक्ताटे आदि उपस्थित होते. यावेळी कु.वैष्णवी यशवंत कदम हीची अमेरिकेतील नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा