शिष्यवृत्ती परीक्षेत तेजस कडूसने मिळवले जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान

अहमदनगर- अहमदनगर तालुक्यातील सारोळा कासार येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील तेजस दत्तात्रय कडूस याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 208 गुण मिळवून जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. त्याला शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. या परीक्षेसाठी तेजस यास विद्यालयाचे प्राचार्य के. एस. भिटे, पर्यवेक्षक बी. एफ. कोकाटे, परीक्षा विभाग प्रमुख श्रीमती अंजुम तांबोळी, विषय शिक्षक पी. जी. मुनफन, श्रीमती एस. बी. कासोळे, एस. एन. गारुडकर, व्ही. एल. सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल तेजस याचा विद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्यांसह मार्गदर्शक शिक्षक तसेच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एस. आर. घिगे, बी. आर. खेंगट, श्रीमती के. एस. शिंदे, श्रीमती एस. व्ही. खोसे, श्रीमती व्ही. जी. पवार, आर. एन. ठुबे, डी. डी. भालसिंग, जे. एस. ठुबे, अंतू भोर, पालक दत्तात्रय कडूस आदी उपस्थित होते. तेजस हा सारोळा कासारचे माजी उपसरपंच दत्तात्रय कडूस यांचा मुलगा आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा