अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट- शहरात 126 तर जिल्ह्यात 408 रुग्ण

अहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधीत आढळून येणार्‍या रुग्णांची संख्या सोमवारच्या तुलनेत मंगळवारी (दि.11) दुप्पट झाली आहे. यामध्ये नगर शहरात 126 तर जिल्ह्यात 408 नवे कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये केलेल्या तपासणीत 156, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 174, रॅपीड ऍन्टीजेन टेस्टमध्ये 78 रुग्ण बाधीत आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहर 126, राहता 48, इतर जिल्हा 41, नगर तालुका 39, श्रीरामपूर 18, अकोले 17, पारनेर 17, कोपरगाव 16, संगमनेर 15, शेवगाव 15, जामखेड 10, श्रीगोंदा 9, मिल्ट्री हॉस्पिटल 8, पाथर्डी 8, कर्जत 5, इतर राज्य 4, राहुरी 4, भिंगार कॅन्टोन्मेंट 4, नेवासा 4 अशा रुग्णांचा समावेश आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा