सेन्सेक्स, निफ्टीची घोडदौड, सेन्सेक्स 60 हजारांच्या पार, निफ्टी 18 हजारांवर

मुंबई – शेअर मार्केटच्या आठवड्याची सुरुवात सकारात्मक झाली आहे. शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजी आली असून सेन्सेक्स 60 हजारांचा आकडा पार केला आहे. तर, निफ्टीही 18 हजारांवर पोहोचला आहे. सोमवारी मार्केट बंद होताना सेन्सेक्समध्ये एकूण 1.09 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,395.63 अंकावर बंद झाला. तर निफ्टीमध्येही 1.07 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,003.30 वर पोहोचला होता. तर आज बाजारात उघडताच सेन्सेक्सने 0.24 टक्क्यांनी उसळी घेत 60,541 वर पोहोचला. त्याशिवाय निफ्टी 0.17 टक्क्यांनी वधारून 18,037 वर पोहोचला आहे. मंगळवारी शेअर बाजारात आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. सोमवारीही बँका आणि आयटी कंपन्यांचे शेअर्स वधारले होते. सोमवारी दिवसभरात एकूण 2472 शेअर्सच्या किंमती कमी अधिक प्रमाणात वधारल्या होत्या. तर 948 शेअर्सच्या किंमती कमी अधिक प्रमाणात घसरल्या. तर 88 शेअर्सच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झाला नव्हता.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा