चला, पुन्हा थिएटरकडे वळू या…

थिएटर – सिनेमागृह – नाट्यगृह कोरोनामुळे बरीच महिने सुनीसुनी होती. प्रत्यक्ष थिएटरमध्ये चित्रपट पाहणं हा रसिकांना स्वर्गीय अनुभव असतो. या चित्रपटसृष्टीचा जन्म एकाएकी झालेला नाही. अनेक वर्षे प्रयोग सुरू होते. गेल्या शतकात चित्रपटाचे तंत्र टप्प्याटप्प्याने उन्मव अवस्थेत पोहोचलं असून निरंतर नव नवे बदल होत असतात.

अगदी प्रारंभी विदेशात ‘अरायव्हल ऑफ अ ट्रेन’ चित्रपट दाखवतांना पडद्यावरची आगगाडी अंगावर येईल म्हणून प्रेक्षकांनी सैरावैरा पळायला सुरुवात केली होती. ख्रिस्तजन्माचा एक मूकपट पाहून, त्यानंतर परदेशी जाऊन दादासाहेब फाळकेंनी पहिला भारतीय मूकपट काढून श्रीगणेशा केला. बाबूराव पेंटरांनी स्वदेशी फिल्म कॅमेरा विकसित केला तर व्ही. शांताराम इ.नी रंगीत चित्रपट काढले. 1935 मध्ये पार्श्वगायन तंत्र आले. नंतर टेक्नीकलर, इस्टमनकलर, स्टिरीओफोनीक, 70 एमएम, थ्रीडी, डॉल्बी इ.इ. आले. आशा व स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलणार्‍या भारतीयांना चित्रपटसृष्टी व गृहांनी सुखद व आनंदी दिवस दिलेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा