महाराष्ट्र संघाला ब्रॉंझ मेडल

अहमदनगर- महाराष्ट्राने 39 वी वरिष्ठ आणि 23 वी खुली स्प्रिंट राष्ट्रीय रोइंग अजिंक्य पद स्पर्धेत दोन हजार मीटरमध्ये आठ जणांच्या कॉकलेक्समध्ये ब्रॉंझ पदकाची कमाई केली. रोइंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आर्मी रोइंग नोड व महाराष्ट्र रोइंग असोसिएशनच्या सहाय्याने या स्पर्धेचे आयोजन आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या संघाने 6 मिनिटे 12.1 सेकंद वेळ नोंदवली. महाराष्ट्राच्या संघात विपुल घुरडे, सागर घुगे, ओंकार म्हस्के, विकास, अखिल चंद्रन, संतोष उमप, आर. राजकुमार, लेकराम, धनंजय पांडे, यांचा समावेश आहे. सर्व्हिसेसच्या संघाने 6 मिनिटे 09.6 वेळ नोंदवून सुवर्णपदक तर आर्मी संघाने 6 मिनिटे 11.3 वेळ नोंदवून रौप्यपदक मिळवले. या आधी महाराष्ट्राच्या मृन्मयी साळगावकरने सिंगल स्कल्समध्ये ब्रॉंझ पदाची कमाई केली आहे. ओंकार म्हस्के हा गोदावरी अकॅडमीचा विद्यार्थी असून कामरगाव, ता.नगर येथील रहिवासी आहे. त्याच्या या यशाबद्दल गोदावरी अकॅडमीचे अध्यक्ष बाजीराव खांदवे, शिक्षिका वर्षा लोखंडे, अरबाज शेख यांनी अभिनंदन केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा