वृध्देश्वर हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

अहमदनगर – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे तिसगाव येथील श्री वृध्देश्वर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून यामध्ये विद्यालयातील सात विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. यामध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चि.कासार सर्वेश हा विद्यार्थी 264 गुण मिळवून जिल्ह्यात आठवा तर तालुक्यात प्रथम आला तर कु.अकोलकर गायत्री (232 गुण) व कु.डहाळे अनुष्का (230 गुण) या विद्यार्थीनी तालुक्यात अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळवत शिष्यवृत्तीधारक झाल्या.

तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु. बनकर नक्षत्रा (182 गुण), कु.जवणे योगिता(162 गुण), कु. शेख सानिया (158 गुण) व कु.कावरे गायत्री (158 गुण) या विद्यार्थीनी शिष्यवृत्तीधारक झाल्या. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब मोटे, उपप्राचार्य लक्ष्मण सोळसे, पर्यवेक्षक संजय म्हस्के व बाळासाहेब बोरुडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक सातपुते एस. एस., किरण दानवे, मरकड डी. व्ही., भिसे ओ. के., आगळे एन. बी., शिक्षिका हरेल एस. एस., अकोलकर एस. बी., ठाकर एस. बी. यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, सेक्रेटरी जी. डी. खानदेशे, सहसेक्रेटरी ऍड. विश्वासराव आठरे, संस्थेचे सदस्य अरविंद आठरे, डॉ. बाळकृष्ण मरकड, चंद्रकांत पा. म्हस्के, सरपंच काशिनाथ पा.लवांडे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा