ना देय ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी निवृत्त मुख्याध्यापकांचे आमरण उपोषण सुरु

अहमदनगर – दोन महिन्यांपूर्वी पेन्शन मंजूर होऊन व एक वर्षापूर्वी सेवा निवृत्त होऊन संस्थेकडून ना देय ना हरकत प्रमाणपत्र दिले जात नाही, त्या निषेधार्थ रयत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकर रामचंद्र पवार यांनी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. उपोषणास्थळी श्री.पवार यांना जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, सचिव अप्पासाहेब शिंदे, रयत मित्र मंडळ, सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश जाधव, उपाध्यक्ष एकनाथ जगताप यांनी भेट दिली. तीनदा शिक्षणाधिकारी अशोक कडूस, संस्था निरिक्षक कन्हेरकर यांचेशी चर्चा केली. मात्र निर्णय होऊ शकला नाही.

अ.ब.क. फॉर्मवर शिक्षणाधिकार्‍यांनी स्वाक्षरी द्यावी व ट्रेझरीकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी संघटनेने केली. मात्र ना देयक ना हरकतवर संस्थेने अगोदर सही करावी. मग पुढील कार्यवाही केली जाईल. यावर शिक्षणाधिकारी ठाम आहेत. मुळातच पेन्शन प्रस्तावावरील नं.10 फॉर्मवर संस्थेने ना देय ना हरकतवर सही दिलेली आहे. पेन्शन मंजुरीनंतर येणे दाखवून पेन्शन प्रकरण अडवून ठेवले आहे. ही भुमिका अयोग्य असल्याचे मत संघटनेने नोंदविले आहे. राज्य कोषागार क्र.सं.ले.व.को.2018 नं. क्र.30/425/12- 10-2018 नुसार मिळणार्‍या रक्कमेवर 18 टक्के व्याज दराने वसूली भरपाईची कार्यवाही संस्थेवर करावी, अशी लेखी मागणी सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक कल्याणकारी संघाने केली, असून गणेशनगर, गणेश माध्यमिक विद्यालय राहाता शाळाप्रमुखास जबादार धरावे. रयत शिक्षण संस्थेत पाच वर्षांहून सेवानिवृत्त होऊनही अधिक काळ लोटला तरी काही सेवानिवृत्तांना पेन्शनपासून वंचित रहावे, लागत असल्याच्या बर्‍याच आहेत. यावर उठाव होणे गरजेचे आहे. यावर न्याय हक्कासाठी लढा देण्याची गरज आहे, असेही म्हटले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा