उमलत्या अन् उसळत्या कवितांचे अद्भूत रसायन

‘रंग माझा वेगळा’ सांगणारं कवीवर्य सुरेश भटांचं आयुष्य स्वतंत्र, स्वयंपूर्ण होतं. त्यांच्या कविता आयुष्याच्या वासंतिक गारवा होत्या, आहेत. त्यांच्या कवितेचा, गाण्यांचा बहर आपल्यासाठी नेहमीच हिरव्यागार फांद्या होऊन बहरत राहतील. त्यांच्या भावगर्भ गझला जीवनास नवउभारी देतील.

भटांची काही गाजलेली गीत/गझले तर पाहा ‘मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं’, ‘मी मज हरखून बसले गं’, ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’, ‘मालवून टाक दीप’, ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘उषःकाल होता होता’, ‘भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागेल’. जीवन संध्या समयीची खंत त्यांनी किती सुरेख सांगितली. केव्हाच सांत्वनाची केली न मी अपेक्षा आपुल्याच आसवांना नादार मानले मी । आयुष्य संपतांना इतकीच खंत होती काही भिकारड्यांना दिलदार मानले मी॥

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा