शिबिरातून कामाचे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होत असते-प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराला भेट

अहमदनगर – जीवनातील शिक्षणात अनुभवाचे स्थान उच्च आहे, शिबिरातुन कामाचे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होत असते. पुस्तकी ज्ञाना बरोबर कुशल व आत्मनिर्भर भारत घडविण्यात एन.एस.एस शिबिराचे योगदान मोलाचे आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व माझी वसुंधरा या संकल्पनेतून होत असलेल्या श्रमसंस्कार शिबिरात युवकांच्या योगदानाने उज्ज्वल भारताचे भविष्य निर्माण होत असते, असे अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. जे.बार्नबस यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर महाविद्यालयतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने टाकळी काझी येथील बन्सीभाऊ म्हस्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या विशेष भेटी दरम्यान आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

शिबिरासाठी प्रमुख शिवसेना शंकरराव ढगे, कांग्रेस आयचे तालुका प्रमुख संपतराव म्हस्के, उपप्राचार्य डॉ.अरविंद नागवडे, उपप्राचार्य डॉ.रजाक सय्यद, आयक्यूएसी समन्वयक डॉ.प्रितम बेदरकर, ईटीआय संचालक डॉ.शरद बोरुडे, रजिस्ट्रार दीपक अल्हाट याचबरोबर सरपंच प्रा.शहाजी आटोळे, उपसरपंच अविनाश पवार, प्राचार्य कुमार म्हस्के यांचे सहकार्य लाभत आहे. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.अशोक घोरपडे, आभार वाय.सी.एम.ओ.यु. अहमदनगरचे संचालक डॉ.जी.एस. गायकवाड़ तर सूत्रसंचालन प्रा.गौरव मिसाळ यांनी केले. यावेळी डॉ.प्रकाश सूर्यवंशी, डॉ.पवनजीत छाबडा, प्रा.वैभव मोरे, प्रा.अजय बनसोडे, प्रा.अजय काकडे, प्रा.दादासाहेब जवरे, प्रा.अजित साळवे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. आर.जे.बार्नबस यांनी कोरोना नंतर होत असलेल्या या शिबिरातील सहभागी स्वयंसेवकांच्या गावातील कामाचे कौतुक केले. तसेच त्यांच्या हस्ते स्वयंसेवकांना खाऊ वितरित करण्यात आला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा