श्रीरामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनच्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राष्ट्रभाषा परीक्षेत यश

अहमदनगर- महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा आयोजित बालबोधिनी प्राथमिक व प्रवेशिका या परीक्षेचे श्रीरामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनचे सेठ नंदलाल धूत इंग्लिश मिडियम स्कूल व मोहनलाल रामअवतार मानधना ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजन केले होते. या परीक्षेसाठी एकूण 27 विद्यार्थी बसले होते. यापैकी 17 विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणीसह उत्तीर्ण झाले व 5 विद्यार्थी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाले. विदयालयाचा निकाल 100 टक्के लागला.

या विद्यालयाचे विद्यार्थी अभ्यासाबरोबरच शालाबाह्य स्पर्धेमध्ये नेहमीच यश संपादन करत असतात. या परीक्षेचे वैशिष्ट्ये म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः शाळेमध्ये येवून पेपर लिहिले. बालबोधिनी परीक्षेत इ. 5 वी मधून शिंगवी चिराग प्रकाश, 6 वी प्राथमिक परीक्षेतून नारायणे निधी शैलेंद्र, प्रांजल दिनेश लाड व इ. 7 वी प्रवेशिका परीक्षेतून भोयटे पृथा धनसिंग, वाघ रितू नितीन, सई सुजित बेडेकर हे विद्यार्थी प्रथम आले आहेत. या परीक्षेसाठी कल्याणी नजान व रोथेल लोंढे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष श्रीगोपाल धूत, उपाध्यक्ष नंदकुमार झंवर, मोहनलाल मानधना, राजेश झंवर, सचिव डॉ. शरद कोलते, सहसचिव बजरंग दरक व संस्थेचे इतर पदाधिकारी व प्राचार्या राधिका जेऊरकर, समन्वयक सावित्री पुजारी व अंजना पंडित यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा