साडेचार वर्षाच्या पियुष सानपने केले कळसुबाई शिखर पार

अहमदनगर – महाराष्ट्रातलं सर्वात उंचीचं आणि गिर्यारोहकांना नेहमीच आव्हान देणारं महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर अवघ्या साडेचार वर्षे वयाच्या पियुष अनिल सानप या बालवीराने सर केलं. नगरच्या पियुष सानप याने हे शिखर अवघ्या तीन तास 25 मिनिटात 5 हजार 400 फूटाचा सुळका युआर फिट क्लब व ट्रेकयात्री या गिर्यारोहक संस्थेसोबत पार केला. कळसूबाई शिखर ज्याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जाते. त्या कळसुबाई पर्वताची उंची समुद्रसपाटीपासून 1646 मीटर एवढी आहे. हे शिखर चढणे अवघड आहे, पण पियुष सानप या साडेचार वर्षीय चिमुकल्याने हे करून दाखवले आहे. नगर जिल्ह्यातील बारी या गावातून त्याने सकाळी 7.35 वाजता चढाई सुरू केली, तर 11 वाजता त्याने कळसूबाई मातेचे दर्शन घेतले. अवघ्या तीन तास पंचवीस मिनिटात त्याने हे शिखर सर केले. त्याच्याबरोबर त्याच्या आई ज्योती, वडील अनिल आणि भाऊ आयुष हेही बरोबर होते. कोणाचीही मदत न घेता पियुषने उंच उंच दगडांवरून एखाद्या सराईत ट्रेकर प्रमाणे मोठं मोठे सुळे पार केले. या कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. चि.पियुष हा गुलमोहोर रोडवरील कृष्णगंगा गारमेंटस्चे संचालक अनिल सानप यांचा मुलगा आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा