बालगीतांच्या ठेक्यावर मिकी माऊसच्या संगतीने नाचत गात बालवाडीचा पहिला दिवस साजरा

(छाया – उदय जोशी,अहमदनगर)

अहमदनगर- ‘‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच’’, ‘‘नानी तेरी मोरनी को मोर ले गये’’, ‘‘लकडी की काठी काठी का घोडा’’ अशा बालगीतांच्या सूरावरती मिकी माऊसच्या सोबत बाल दोस्तांनी शाळेचा पहिला दिवस साजरा केला. सावेडीच्या श्री समर्थ विद्या प्रशालेच्या आनंदवन भुवन बालवाडीचे वर्ग आजपासून सुरू झाले त्या निमित्त वर्गशिक्षिकांनी सर्व विद्यार्थिनींचे औक्षण करून स्वागत केले. विद्यार्थी व विद्यार्थिनी एक दिवसाआड एक दिवस असे वर्गाचे आयोजन संस्थेने केले आहे. यानिमित्ताने सर्व विद्यार्थिनी आज शाळेच्या पहिल्या दिवशी हजर होत्या त्यांचे स्वागत वर्गशिक्षिकांनी औक्षण करून केले.

समर्थ विद्याप्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन डी. आर. कुलकर्णी, शालेय समितीचे चेअरमन सुरेश क्षीरसागर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी. एम. कासार यांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले. तसेच आपल्या पाल्याची आपल्यापेक्षा देखील जास्त काळजी शाळेतील सर्व कर्मचारी व अधिकारी, पदाधिकारी घेतील अशी ग्वाही दिली. यावेळी मुलांचे हसतखेळत स्वागत करत मुख्याध्यापक डी. एम. कासार यांनी पालकांना आवश्यक त्या सूचना दिल्या. एक दिवसाआड भरणार्‍या या शाळेत मुला व मुलींना त्या त्या वेळी वेळेत पाठवावे असे आवाहन त्यांनी पालकांना केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा