गुलमोहोर रोडवरील स्वामी समर्थ मंदिरात महाप्रसाद

(छाया – विजय मते,अहमदनगर)

अहमदनगर – सावेडी उपनगरात गुलमोहोर रोडवरील सावली सोसायटीमधील श्री स्वामी समर्थ मंदिरात दत्त जयंतीनिमित्त सात दिवस श्री गुरुचरित्र पारायण सोहळा पार पडला. दत्त जयंतीला ‘श्रीं’च्या मूर्तीला पहाटे लघुरुद्र अभिषेक होऊन सकाळी 9 वा. दत्तयाग करण्यात आला. सायं. 6 वा. दत्त जन्म सोहळा पार पडला. यावेळी पाळणा सजविण्यात आला होता, तर मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दत्त जन्मास भाविक उपस्थित होते. महिलांनी पाळणा गाणी म्हटली. रविवारी दुपारी महाआरती, महाप्रसाद होऊन दत्त जयंती सप्ताहाची सांगता झाली. दुपारी श्री स्वामी समर्थ मंदिरात सौ. व श्री हिंमत मेहेरवाल आणि सौ. व डॉ.व्यंकटेश पुंडे या दाम्पत्यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

याप्रसंगी अक्षय कर्डिले, नगरसेविका ज्योती गाडे, नगरसेवक रामदास आंधळे, विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, मंदिराचे विश्वस्त सुनिल मानकर, संजय देशपांडे, पंकज गुजराथी, बाबासाहेब मरकड, संतोष उपाध्ये, श्रीकांत आराध्ये, देविदास म्हस्के, विनोद पोरे, तात्या जोगदंड, निखिल देवरे, जितेंद्र चत्तर, रमेश म्याना आदिंसह भाविक उपस्थित होते. सावली सोसायटीतील हे मंदिर अक्कलकोट येथील मंदिराप्रम ाणे असून, मंदिरात नित्यनियमाने पहाटेची महापूजा दुपारी व रात्री आरती होत असते. दत्त जयंती, स्वामी समर्थ प्रकट दिन हे उत्सव मोठ्या उत्साहात येथे साजरे केले जातात. या प्रभागातील नगरसेवक, माजीनगरसेवक मंदिर व परिसर सुशोभिकरणासाठी प्रयत्नशील असतात, याबद्दल सर्वांचे आभार सुनिल मानकर यांनी मानले. सर्व उपस्थितांचा मंदिर समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा