श्री माहेश्वरी युवा संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिनदर्शिकेचे प्रकाशन समाजातील प्रत्येक घटकांची प्रगती झाली पाहिजे-विशाल झंवर

अहमदनगर – श्री माहेश्वरी युवा संघटनेच्यावतीने समाजातील युवकांचे प्रश्न सोडवून त्यांना दिशा देण्याचे काम सुरु आहे. यासाठी विविध उपक्रमांचे नियमित आयोजन करण्यात येत असते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे कार्यक्रमांवर बंदी असल्याने उपक्रम राबविता आले नाही. आता संघटनेच्यावतीने समाज संघटनाचे कार्य पुन्हा नव्या जोमाने सुरु केले आहे. येणार्या नवीन वर्षांचे स्वागत दिनदर्शिकेने करुन वर्षभरात महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. समाजातील प्रत्येक घटकांची प्रगती झाली पाहिजे, या उद्देशाने संघटनेचे युवा कार्य करत आहेत. यासाठी युवती संघ, ज्येष्ठ संघाचे सहकार्य मिळत असते, असे प्रतिपादन श्री माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष विशाल झंवर यांनी केले.

श्री माहेश्वरी युवा संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 2022 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष विशाल झंवर, सचिव शेखर आसावा, खजिनदार सीए अनिकेत बलदवा, शाम भुताडा, गणेश लढ्ढा, अमित काबरा, अमित जाखोटिया, उमेश झंवर, सिद्धार्थ झंवर, सुमित बिहाणी, सुमित चांडक, प्रतिक सारडा, कुणाल लोया, योगेश सोमाणी, पियुष झंवर, राहुल सोनी, गोविंद जाखोटिया, मुकुंद जाखोटिया, पवन बंग आदि उपस्थित होते. याप्रसंगी सचिव शेखर आसावा म्हणाले, गेल्या वर्षभरात संघटनेच्यावतीने मोजक्याच उपक्रम राबविण्यात आले. कोरोना काळात गरजू समाज बांधवांना मदतीचा हात देऊन त्यांना आधार देण्याचे काम संघटनेने केले आहे. सर्व पदाधिकारी संघटनेच्या कार्यात आपआपल्यापरी योगदान देत आहे. यातून समाजहिताचे काम सुरु आहे. येणार्‍या नूतन वर्षातही नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. सीए अनिकेत बलदवा यांनी संघटनेच्या वार्षिक आढावा सादर करुन संघटनाच्यावतीने सुरु असलेल्या कामकाजाची माहिती दिली. आभार शेखर आसावा यांनी मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा