दैनिक पंचांग बुधवार, दि. 22 डिसेंबर 2021

संकष्ट चतुर्थी, शके 1943 प्लवनाम संवत्सर मार्गशीर्ष कृष्णपक्ष पुष्य 24।45 सूर्योदय 06 वा. 27 मि. सूर्यास्त 06 वा. 25 मि. राशिभविष्य

मेष    –  आर्थिक विषयांमध्ये आपले प्रयत्न आपणास यश मिळण्याचे कारण ठरतील. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून समर्थन मिळेल. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.

वृषभ    –  कला क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. आपणास नवे वाहन मिळण्याची शक्यता आहे. मानसन्मानात वाढ होईल. जुने मित्र भेटतील.

मिथुन    –  एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीती भेट आपल्यासाठी आनंदाची ठरेल. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शक्यता आहे. वाहने व उपकरणे जपून वापरावीत.

कर्क      –  आज आपणास कठोर श्रम करावे लागतील. काही निष्कारण चिंतांमुळे आपली व्यग्रता वाढेल. कौटुंबिक स्वास्थ्य चांगले राहिल.

सिंह      –  आपला जोडीदार आपणास भावनात्मक पाठबळ देईल. मित्रांमध्ये होणारे वाद आपल्या संबंधासाठी वाईट ठरतील.

कन्या      –  मानसिक स्थिती आल्हाददायक राहील व वरिष्ठांबरोबर संपर्कात आल्याने प्रसन्न वातावरण राहील. संततीसौख्य लाभेल. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील.

तूळ       –  आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. आरोग्याची काळजी घ्या. व्यस्त राहाल.

वृश्चिक   –  इतर लोकांना आपल्या स्वतः च्या आवश्यकता व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे.

धनु       –  कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती संमिश्र राहील.

मकर      –  आपल्या जुन्या लोकांबरोबर किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे या वेळी आपल्यासाठी फलदायी ठरेल.

कुंभ       –  एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. पितृचिंता सतावेल. वाहने चोरीला जाण्याचा संभव आहे.

मीन      –  चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा