माजी नगराध्यक्षा श्यामला ताडे यांची गळफास घेवून आत्महत्या

अहमदनगर- श्रीगोंदा शहराचे नगराध्यक्षपद भूषविलेल्या श्यामला मनोज ताडे (वय वर्ष 40) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राहत्या घरामध्ये गळ्याभोवती साडी गुंडाळलेला वर फॅनला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला आहे. सोमवारी (दि.20) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. किरण दगडू ताडे (वय वर्ष 43) यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला या घटनेबाबत माहिती दिली आहे.

सदरील घटना श्रीगोंदा शहरातील धनश्री अपार्टमेंट येथे त्यांच्या राहत्या घरात घडली आहे. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार श्यामला ताडे या श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये अडीच वर्ष नगराध्यक्ष पदावर कार्यरत होत्या. अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षित जागेवर त्या निवडून आल्या होत्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा