श्रीरामकृष्ण सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी ॲड. अशोक बंग यांची एकमताने निवड

(छाया – जितेंद्र अग्रवाल)

अहमदनगर- श्रीरामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडीट सोसायटीच्या संचालक मंडळाची सभा संस्थेच्या मुख्य कार्यालयात सहकार अधिकारी श्रीमती पी.एन.सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या सभेत व्हाईस चेअरमन निवडीसाठी ऍड.अशोक बंग यांच्या नावाची सूचना लक्ष्मीकांत झंवर यांनी केली तर ओमप्रकाश चांडक यांनी अनुमोदन दिले. या पदासाठी केवळ एकच अर्ज आल्याने सभेच्या अध्यक्षा श्रीमती पी.एन.सुर्वे यांनी व्हाईस चेअरमन पदावर ऍड. अशोक बंग यांची निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी संस्थेचे चेअरमन श्रीगोपाल धूत, माजी व्हा.चेअरमन विश्वनाथ कासट, संचालक राजेंद्र गुजराथी, प्रकाश गांधी, लक्ष्मीकांत झंवर, ओमप्रकाश चांडक, गोपाल मनियार, राजेंद्र कंत्रोड, सौ.मथुराबाई झंवर, श्रीमती अनुरिता झगडे, देवराम साठे, व्यवस्थापक शशिकांत पुंडलिक, कुमार आपटे, वसुली अधिकारी श्री.राऊत उपस्थित होते.

संस्थेचे चेअरमन श्रीगोपाल धूत यांच्या हस्ते सभेच्या अध्यक्षा श्रीमती पी.एन. सुर्वे व नूतन व्हा.चेअरमन अँड.अशोक बंग यांचा सत्कार करण्यात आला. नूतन व्हा.चेअरमन श्री. बंग म्हणाले की,सर्व संचालकानी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करून संस्थेचे व सभासदाचे हित जोपासत आर्थिक उन्नतीसाठी प्रमाणिकपणे कार्यरत राहील. उपस्थित सर्व संचालकांनी नूतन व्हा.चेअरमन श्री.बंग यांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा