दुःख ज्याचे त्याचे… वाटे मोठे… महत्त्वाचे

प्रत्येकाला नेहमी वाटत असते की आपल्या वाट्याला जे दुःख आलं, जे अनुभव आपण घेतले ते जगापेक्षा निराळे आहेत! असं वाटतं, कारण आपल्या दुःखात गुरफटून घेऊन मनुष्य उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहातच नाही! प्रत्येक दुःखाच्या आपापल्या कक्षा असतात, त्या त्या कक्षांमध्ये असेपर्यंत दुःख पर्वताएवढी प्रचंड वाटतात. त्या दुःखामध्ये गुरफटून न घेता डोळे व मन उघडे ठेवून जगाकडं पाहिलं तर लक्षात येतं आपण खूप सुखी आहोत, असं वाटण्याएवढी दुःखं लोक अनुभवतात.

प्रत्येकाचे आपले हृदयस्थ दुःख असते. प्रत्येकाची आपापली भाव- विवशता असते. मनुष्य बोलून दाखवत नाही. कधी बोलून दाखवायची इच्छा नसते तर कधी इच्छा असली तरी बोलून दाखवता येत नाही. ज्याचे त्याचे दुःख स्वतःपुरते मोठेच असते!

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा