भविष्यकाळात तपोवन रस्त्याला बाजारपेठ निर्माण होणार-विरोधी पक्षनेता संपत बारस्कर

ज्ञानसंपदा शाळा परिसरात पिण्याच्या पाण्याची लाईन कामाचा शुभारंभ

(छाया – लहू दळवी,अहमदनगर) 

अहमदनगर – तपोवन रस्त्याचे काम आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून मार्गी लागल्यामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळाली आहे. भविष्यकाळात तपोवन रस्त्याला मोठी बाजारपेठ निर्माण होणार आहे. या परिसराच्या विकासाला गती मिळाल्यामुळे या भागात नागरिक मोठ्या संख्येने राहण्यासाठी येत आहे. याचबरोबर बांधकाम व्यवसायिका मोठमोठ्या इमारती बांधत आहे. तरी या भागातील नागरिकांना मूलभूत प्रश्नापासून सुख-सुविधा देणे गरजेचे आहे. यासाठी मनपा व आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून तपोवन रोडवरील मोठी विकास कामे सुरू आहे. तपोवन रस्ता परिसरातील ज्ञानसंपदा शाळा परिसरात बांधकाम व्यवसायिकांनी स्वखर्चातून पिण्याचे पाण्याचे योजनेचे काम सुरू केले आहे. विकास कामांमध्येही व्यावसायिकांनीही हातभार लावावा असे प्रतिपादन विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांनी केले.

तपोवन रस्ता ज्ञानसंपदा शाळा परिसरात बांधकाम व्यवसायिकांनी स्वखर्चातून पिण्याचे पाण्याचे लाईन कामाचा शुभारंभ झाला. यावेळी विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, माजी उपमहापौर हाजी नजीर शेख,नितीन बारस्कर, आकाश गुरुराणी, मयूर राहिंज, दिनेश शिरसागर, संतोष लबडे, रामदास उदमले, ललित शिरसागर, नरेंद्र कोलते, अशोक साळवे, प्रवीण खराडे आदी उपस्थित होते. डॉ. सागर बोरुडे म्हणाले की तपोवन रास्ता परिसरामध्ये डीपी रोडच्या विकास कामांना गती दिली आहे. याच बरोबर पाणी लाईटचे प्रश्न मार्गी लागत आहे. प्रभाग क्रमांक एक हा भविष्यकाळात नगर शहराचा विकसित भाग म्हणून ओळखला जाईल. श्रीपाद पार्क, श्रद्धा पार्क, प्राईम पार्क, लक्ष्मी टावर्स, शुभ कलश रेसिडेन्सी, शुभ कॉलनी, बांधकाम व्यावसायिकांच्या वतीने स्वखर्चाने पिण्याच्या पाण्याची लाईनचे काम सुरू केले आहे. असे ते म्हणाले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा