गुणवत्ता व सेवा योग्य मोबदल्यात दिले तर व्यवसायात यश निश्चित प्राप्त होते आ.संग्राम जगताप

‘सर्कल ऑटो वर्क्स सर्व्हिस सेंटर’चा शुभारंभ

(छाया – जितेंद्र अग्रवाल)

अहमदनगर – गुणवत्ता व सेवा योग्य मोबदल्यात दिले तर व्यवसायात यश निश्चित प्राप्त होते व गिल्डा परिवार याच उद्देशाने कार्यरत असल्याचे मत आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. पुण्यातील यशस्वी कारकिर्दीनंतर अत्याधुनिक मशिनरी व कुशल कारागीरसह सर्व प्रकारच्या दुचाकी वाहनांच्या नगरमधील सर्कल ऑटो वर्क्स या सर्व्हिस सेंटरचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते म्हणाले की समाजातील सर्व स्तरावर गिल्डा परिवाराच्या संपर्काचे सर्कल आहे हे अत्यंत महत्वाचे असून ते सतत वाढत राहो. कार्यक्रमास मनपा स्थायी समिती अध्यक्ष अविनाश घुले, ज्ञानदेव पांडूळे, उमेश गिल्डा, सौ. गीता गिल्डा, पौरस व निष्णात गिल्डा आदी उपस्थित होते.

बीई मेकेनिकल असलेले या फर्मचे संचालक पौरस गिल्डा यांनी आ.जगताप यांचे स्वागत केले. भारतीय व विदेशी बनावटीच्या सर्व दुचाकी वाहनांची दुरुस्ती व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध असून घरपोच सेवा देखील उपलब्ध असणार आहे. पुण्यातील सात वर्षाचा अनुभव असल्यामुळे नगर मधील ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा मानस पौरस यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास समाज कल्याण माजी अधिकारी रफिक मुन्शी, नगरसेवक दत्ता कावरे, बाळासाहेब बोराटे, श्रीगोपाल धूत, मोहन मानधना, संजय चोपडा, डॉ.मिस्कीन, बाबुशेठ टायरवाले, भरत जाखोटिया, गिरीश लुंकड, सुधीर पगारिया, भगवान फुलसौंदर, अनिल पोखरणा, मीनाताई मुनोत, जगदीश इंद्राणी, हरिष काबरा, शैलेश चंदे, नकुल चंदे, अरुणा गोयल, वंदना पंडीत, सुहास व नीता देवराईकर आदी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा