महापालिका कर्मचारी पतसंस्थेवर सहकार पॅनेलची सत्ता सर्व 15 जागा जिंकल्या- विरोधी जनसेवा पॅनेलचा दारूण पराभव

(छाया-बबलू शेख,अहमदनगर)

अहमदनगर – अहमदनगर महापालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत बाबासाहेब मुदगल व जितेंद्र सारसर प्रणित सहकार पॅनेलने सर्व 15 जागांवर विजयी पताका फडकावत विजय मिळवला. या निवडणुकीत कैलास भोसले प्रणित जनसेवा पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. संस्थेच्या 15 जागांसाठी 93 अर्ज दाखल झाले होते, परंतु माघारीनंतर रिंगणात 34 उमेदवार होते. ही निवडणूक कैलास भोसले प्रणित जनसेवा पॅनेल विरूद्ध बाबासाहेब मुदगल प्रणित सहकार पॅनल अशी झाली. दोन्ही पॅनेलने प्रचाराचा धुराळा उडवत मतदार सभासदाच्या वैयक्तीक भेटीगाठी घेऊन साकडे घातले होते. सभासद हिताचा कारभार करण्याची ग्वाही देत, विजयाचा दाव या दोन्ही प्रतिस्पर्धी पॅनेलने केला होता. शनिवारी 15 जागांसाठी बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडली, त्यानंतर सायंकाळी उशिरा निकाल जाहीर झाला.

संस्थेचे सुमारे 1 हजार 246 सभासद असून त्यापैकी 1 हजार 152 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सहकार पॅनेलने विद्यमान नऊ संचालकांना पुन्हा एकदा रिंगणात उरवले होते. तर जनसेवा पॅनेलने तीन विद्यामान संचालकांसह तरूण उमेदवारांना संधी दिली होती. या निवडणुकीत सहकार पॅनेलचे सतिश ताठे, बाबासाहेब मुदगल, विकास गीते, श्रीधर देशपांडे, बलराज गायकवाड, अजय कांबळे, बाळासाहेब पवार, विजय कोतकर, कैलास चावरे, सोमनाथ सोनवणे, गुलाब गाडे, प्रमिला पवार, उषा वैराळ, किशोर कानडे, बाळासाहेब गंगेकर हे उमेदवार विजयी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी किरण आव्हाड यांनी काम पाहिले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा