सोमवारपासून ‘योग विद्या धाम’चे योग वर्ग नियमित सुरू

अहमदनगर- योग विद्या धामचे योग प्रवेश, योग संजीवन, योग चैतन्य संस्कार व उंची संर्वधन, योग परिचय व सराव वर्ग प्रत्यक्षपणे (ऑफलाईन) सोमवार दि. 20/12/2021 पासून नगर शहरात विविध ठिकाणी सुरू होत असल्याची माहिती योग विद्या धामचे अध्यक्ष डॉ. सुंदर गोरे यांनी दिली. योगाचे हे वर्ग कुष्ठधाम रोडवरील योग भवन, गुलमोहर रोडवरील नवले हॉल, सावेडी व सिध्दबाग, नगर येथील योग भवन येथे सकाळी व सायंकाळी घेतले जाणार आहेत. चांगले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणारे योगाचे वर्ग जास्तीत जास्त लोकांनी करावेत, असे आवाहन योग विद्या धामचे कार्याध्यक्ष जयंत वेसीकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अनिरुद्ध भागवत भ्रमणध्वनी 9423162438 यांचेशी संपंर्क साधावा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा