मयतांच्या वारसांना 77 लाख रूपये नुकसान भरपाई

अहमदनगर – ट्रकने धडक देऊन झालेल्या अपघातातील मयत संदिप भास्कर पिंपळे यांच्या वारसांना 77 लाखांची अपघात नुकसान भरपाई देण्याचा आदेश जिल्हा सत्र न्यायाधिश बी.एम. पाटील यांनी दिला आहे. मयताचे वारसांच्या वतीने ऍड. राजेश कातोरे यांनी काम पाहिले. नगर शहराजवळील नागापूर येथील संदीप भास्कर पिंपळे यांचा नगर- मनमाड रस्त्यावरील सावेडी शिवार, नगर येथे दि.22 डिसेंबर 2018 रोजी रस्ता अपघातात (ट्रक क्र.आर जे 03 जी.ए. 8542) ची धडक बसून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. मयत पिंपळे यांच्या वारसांनी ट्रक मालक व विमा कंपनी विरोधात अपघात नुकसान भरपाई मिळावी, यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अर्जाची सुनावणी होऊन न्यायालयाने मयताचे वारसांना मुद्दल व व्याज असे मिळून रक्कम 77 लाख रूपये अपघात नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा