ज्युनिअर व युथ गटाच्या व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धा

अहमदनगर- राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धे साठी अहमदनगर जिल्हा ज्युनिअर व युथ गटाच्या व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धा 19 डिसेंबर रोजी होत आहे. महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणार्‍या 18 वर्षे वयोगटातील मुले व मुलीच्या राज्य स्पर्धा 31 डिसेंबर ते 2 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये उस्मानाबाद येथे होणार आहे तसेच युथ 21 वर्ष मुले व मुलीच्या राज्यस्तरीय स्पर्धा चंद्रपूर येथे 7 ते 9 जानेवारी 2022 या कालावधीत आयोजीत करण्यात आल्या आहेत.

या स्पर्धेसाठी पुणे विभागीय संघ निवडण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याच्या व्हॉलीबॉल संघाची निवड चाचणी स्पर्धा 19 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क येथे घेण्यात येणार आहे. निवड चाचणी स्पर्धेसाठी 18 वर्षे वयोगटासाठी 1/1/2004 व 21 वर्ष वयोगटासाठी 1/1/2001 जन्मतारीख असावी. खेळाडूने सोबत आधार कार्ड तीन पासपोर्ट साईज फोटो जन्मतारखेचा दाखला, एस.एस.सी बोर्डाचे प्रमाणपत्र सोबत आणावे असे आवाहन अहमदनगर जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव एल. बी. म्हस्के यांनी केले आहे. खेळाडूंनी निवड चाचणी स्पर्धेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार प्रसादराव तनपुरे, उपाध्यक्ष प्रा. रमेश मोरगावकर, शैलेश गवळी, खजिनदार प्रा. संजय अनभुले, प्रा. बबनराव झावरे यांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा