अहमदनगर शहरातील आकाश डाके टोळी विरुद्ध विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर- तोफखाना पोलीस स्टेशनच्या आवारात चाकू, कोयते घेऊन भांडण करणार्‍या व नगर जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी करण्यात कुप्रसिद्ध असलेल्या अहमदनगर शहरातील आकाश डाके टोळी विरुद्ध मोक्का कायद्यान्वये विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. नगर शहरातील बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर भागामध्ये महिलांच्या दोन गटांमध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद झाला. त्याची फिर्याद दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट एकमेकांसमोर भिडले त्यापैकी एका गटाने चाकूने व कोयत्याने दोघांवर हल्ला चढवला. याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादी सचिन निकम यांचे फिर्यादी वरून गणेश कुर्‍हाडे, आकाश डाके, किरण सोमनाथ, सागर डाके, बाळासाहेब वाघमारे आणि दोन विधि संघर्शित बालक यांचे विरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही टोळी संघटित गुन्हेगारी करणारी होती तसेच या टोळीवर नगर शहरासह विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल होते. त्यामुळे या टोळी विरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करणे करिता विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. सदर प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे मंजुरी मिळाल्यानंतर पुढील तपास पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांचेकडे वर्ग करण्यात आला होता.

या गुन्ह्यात आकाश डाके टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999चे कलम 3 (1) (ळळ) , 3 (2), व 3(4) मोक्का अन्वये अपर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मिळाली. गुन्ह्याचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपधीक्षक संदीप मिटके यांनी करून विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तपास कामात त्यांना तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, उपनिरीक्षक समाधान सोळांखे, राजू भालसिंग, पोलीस नाईक किरण बनसोड यांनी सहकार्य केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा