हुसैनी कबाब मसाला

साहित्य – 2 उकळलेले बटाटे, 2 गाजर, 100 ग्रॅम. फ्रेंच बीन्स, एक कांदा, 2 चमचे टोमॅटो सॉस, 50 ग्रॅम. काजू, 100 ग्रॅम वाटाणे, थोडासा पुदीना, 2 चमचे लाल मिरची, एक लिंबाजी खाप, 1 चमचे साखर, 100 ग्रॅम कॉर्नफ्लोर, चवीनुसार मीठ, थोडासा गरम मसाला, पालक ग्रेवी, हिरवी चटणी, चिज.

कृती – गाजर, वाटाणे आणि फे्रंच बीन्स उकळून घ्यावे, त्यानंतर ते पाण्यात काढून कुस्करून घ्यावे. बटाटे आणि पुदीना बारीक कापून यात टाकावा आणि सर्व सामग्रीस व्यवस्थित मिळवावे. नंतर यात लिंबू पिळून साखर व मसालाही टाकावा. आता याचे छोटे छोटे गोळे बनवावे आणि ह्या गोळ्यांना कॉर्नफ्लोरमध्ये गुंडाळून लालसर होईपर्यंत तळावे. पालक ग्रेवी, हिरवी चटणी व चीज याबरोबर गोळे प्लेटमध्ये सजवावे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा