संकटाचा सामना

स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करीत असताना एकदा वाराणसीला आले. दुर्गामातेचे दर्शन घेऊन स्वामीजी परत रस्त्याच्या एका बाजूला पाण्याचा तलाव होता. तर दुसर्‍या बाजूला उंच भित होती. स्वामीजी त्या रस्त्यावरून चालत असताना काही वानरे त्यांच्या पाठोपाठ येऊ लागली. ती मोठमोठाली वानरे पाहून स्वामीजी भराभर चालू लागले. वानरेही वेग घ्यायला लागली. स्वामीजींनी आपला वेग वाढवला आणि ते जोराने पळू लागले. वानरांनी जोरात पळत येऊन स्वामीजींना ती त्यांना आडवी येऊ लागली. आणि अंगाशी झोंबू लागली. काय करावं स्वामीजींना सुचेना. रस्त्याच्या बाजूला एक खेडूत उभा होता. त्याने हा प्रकार पाहिला आणि स्वामीजींना म्हणाला, पळू नका, वानरांकडे तोंड करा. त्याचे बोलणे ऐकून मागे फिरले आणि वानरांकडे तोंड करून उभे राहिले. हे पाहून वानरे बिचकली आणि मागच्या मागे पळून गेली. हा प्रसंग स्वामीजी नेहमी सांगत, आयुष्यात एक फार मोठा धडा मी या प्रसंगामुळे शिकलो.

तात्पर्य – संकटापासून पळून जायचे नाही, तर त्याला तोंड द्यायचे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा