मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज बडीशेप खाल्ल्याने शरीरास कोणता फायदा होतो

आपल्यापैकी बरेच जणांना हमखास जेवण झालं की, तोंडात बडीशोप टाकायची सवयही असतेच. काहीजण बडीशेपचा वापर हा जेवणात मसाल्याचा पदार्थ म्हणूनही करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, बडीशेप ही फक्त मुखवास म्हणूनच उपयोग नाहीतर याचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. जसं बडीशेप किंवा सौंफ हे तुमच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठीही उपयोगी आहे. बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात क जीवनसत्त्व आढळतं. तसंच बडीशेपमध्ये कॅल्शिअम, सोडीयम, फॉस्फरस, आर्यन आणि पोटॅशिअमसारखी आवश्यक खनिजंही असतात. त्यामुळे रोजच्या आहारात किंवा आहारानंतर बडीशेपचं सेवन करणं उत्तम आहे. त्याचप्रमाणे बडीशेप खाल्ल्याने तोंडाच दुर्गंधी कमी होते. त्यामुळे बरेचदा मुखवास म्हणून याचा वापर केला जातो. रक्तदाबावरही बडीशेप गुणकारी आहे तसेच शरीरातील पाण्याचा योग्य प्रकारे निचरा करण्यासाठीही बडीशेपचा उपयोग होतो. रक्तशुद्धीसाठीही बडीशेप मदत करते. बद्धकोष्ठता आणि अपचन यावरही बडीशेप गुणकारी आहे. बडीशेप नियमित खाल्ल्यास तुमची दृष्टीही सुधारण्यास मदत होते. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर बडीशेप नक्की खा. अस्थमासारख्या आजाराची लक्षणे कमी करण्यासही बडीशेप गुणकारी आहे. स्तनपान करणार्‍या मातांसाठीही बडीशेप खाणे फायदेशीर असते. पण बडीशेप फायदेशीर असते म्हणून तिचे अति सेवन करणे चांगले नाही. जेवणानंतरही ठराविक प्रमाणातच बडीशेप खावी.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा