‘हिवताप निर्मुलन’ संघटनेच्या आंदोलनाला शासकीय कर्मचारी संघाचा पाठिंबा

अहमदनगर – नवीन सेवा प्रवेश नियम सेवेतील जुन्या कर्मचार्‍यांना हिताचे नसल्याने या नियमांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी राज्यातील हिवताप निर्मुलन कर्मचारी संघटनेच्यावतीने ‘लेखणीबंद’ आंदोलन सुरु केले आहे. नगर येथे सुरु केलेल्या आंदोलनात अध्यक्ष किसन भिंगारदिवे, सरचिटणीस पुरुषोत्तम आडेप आदि पदाधिकार्‍यांसह कर्मचारी सहभागी झाले आहेत. दरम्यान महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघाच्या नगर जिल्हा शाखेने पाठिंबा आंदोलनात सहभागी होत असल्याबाबत पत्र जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.रविंद्र कानडे यांना दिले. याप्रसंगी अध्यक्ष सतीश जाधव, सचिव संतोष सुरवसे, प्रशांत सहस्त्रबुद्धे, निलेश वैराळ, संजय जासूद आदि उपस्थित होते.

29/9/2021 रोजीची अधिसूचना हिवताप विभागातील कर्मचार्‍यांना अन्यायकारक असल्याने त्यामध्ये आवश्यक बदल करून पदोन्नतीचा मार्ग मोकळा करावा यासाठी हिवताव संघटनेने पुकारलेले काम बंद आंदोलन कर्मचारी हिताचे असल्याने त्यामध्ये सहभागी झाल्याचे प्रदेश अध्यक्ष सुनील मुंगसे यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सतीश जाधव,सचिव संतोष सुरवसे, गोरक्ष कर्डिले, अशोक तोडमल, दिलीप पोळ, अशोक जाधव, ज्ञानेश्वर गोसावी, धोंडीराम शेळके, एकनाथ पवार, अर्जुन वाघमोडे, प्रशांत सहस्त्रबुद्धे, सुनील दळवी, कैलास हरदे, थोरात टी. पी, मोटकार सर, राहिंज सर, निलेश वैराळ, संजय जासूद आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा