ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता यांचे दीर्घ आजाराने निधन

अहमदनगर- नगरमधील ज्येष्ठ पत्रकार सुधीर कचरदास मेहता (वय-65, रा. प्रोफेसर कॉलनी चौकाजवळ, सावेडी, नगर) यांचे बुधवारी 15 रोजी रात्री 11 च्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. ते ‘काका’ व ‘देश का नेता’ या टोपण नावाने ओळखले जात. मेहता यांच्या पार्थिवावर गुरूवारी 16 रोजी सकाळी 10.30 वा. नालेगाव अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वृत्तपत्र क्षेत्र, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी आदी क्षेत्रातील लोक उपस्थित होते.

ते मधुमेहाच्या आजारावर गेल्या काही वर्षांपासून उपचार घेत होते. अनेकवेळा आजार बळावल्यावर त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत असे.पत्रकारितेबरोबरच ते ‘नगर महोत्सवा’चे दरवर्षी यशस्वी आयोजन करीत. त्यानिमित्त विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे ते आयोजन करीत असत. नगरमधील अनेक वृत्तपत्रातून त्यांनी काम केले व विपूल लेखनही केले. एक लढावू, झुंजार पत्रकार, स्पष्टवक्ता, विविध क्षेत्राच्या सखोल माहितीचा खजिना असलेले व्यक्तीमत्व, अनेकांचे मित्र, दिलदार, हसतमुख, धडपडे व्यक्तीमत्व हरपल्याची प्रतिक्रीया अनेकांनी व्यक्त केली. माजी नगराध्यक्ष स्व. नवनीतभाई बार्शीकरांचे ते खंदे समर्थक होते. जिल्हा पत्रकार संघा बरोबरच अहमदनगर प्रेस क्लब, दिल्लीच्या स्मॉल ऍण्ड मिडीयम न्यूज पेपर संघटनेचे पदाधिकारी होते. दैनिक पुढारीचे मुख्य उपसंपादक मयुर मेहता यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, 1 मुलगा, सुन, नातू असा परिवार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा