अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्यावतीने विद्यार्थ्यांची मोफत तपासणी प्राथमिक स्तरावर निदान झाल्यास आरोग्य अबाधित राहते-प्रा.डॉ.अब्दुस सलाम

अहमदनगर – कोरोनानंतर आता शाळा सुरु होत आहेत. या दीड-दोन वर्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यांचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधे दिली आहेत. त्यामुळे प्राथमिक स्तरावरच निदान होऊन आरोग्य अबाधीत राहण्यास मदत होईल. या उपक्रमासाठी अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुकास्पद असाच आहे. विद्यार्थ्यांना सर्वांगिण विकासासाठी संस्थेच्यावतीने सर्वोतोपरि प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन मासुमियॉं एज्युकेशन सोसायटी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.अब्दुस सलाम सर यांनी केले.

मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीच्या विविध शैक्षणिक शाळा, विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी मोफत तपासणी केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.अब्दुस सलाम सर, डॉ. नाजेमा सय्यद, कॉ.रिजवान, मुख्याध्यापिका फरहाना शेख, बहार अंजुम, शबाना जहागिरदार, अंजुम खान आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन शबाना जहागिरदार यांनी केले तर आभार अंजुम खान यांनी मानले. मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे पालकांनी कौतुक केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा