जागतिक अपंग दिवसानिमित्त दिव्यांग राईडमध्ये भरत झंवर यांचा प्रथम क्रमांक

अहमदनगर – भरत झंवर यांनी नासिक सायकलिस्ट रॉयल रायडर्स तर्फे आयोजित दिव्यांग सायकल राईड या उपक्रमामध्ये सात दिवसांमध्ये 1221 किलोमीटर अंतर पूर्ण करून प्रथम क्रमांक प्राप्त केला. 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत सुरु असलेल्या या दिव्यांग राईड मध्ये श्री. झंवर यांनी 7 दिवसांमध्ये 1221 किलोमीटर इतके अंतर सोलो सायकलिंग करून पूर्ण केले. श्री. झंवर यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल नासिक येथील नाशिक सायकलिस्ट, रॉयल रायडर्सचे डॉ.आबा पाटील यांनी अभिनंदन केले आहे. तसेच अहमदनगर सायकलिस्टचे चंद्रशेखर मुळे, सौ. सुवर्णा मुळे, कल्पना शिंदे, शरद काळे यांनी त्यांचे कौतुक केले आहे. 5 डिसेंबर रोजी त्यांनी अहमदनगर ते औरंगबाद व परत असे 250 किलोमीटर चे अंतर पूर्ण करून दिव्यांग व्यक्तींना आपली राईड समर्पित केली. औरंगाबाद येथे पोहोचल्यानंतर औरंगाबाद जिल्हा सायकलींग असोसिएशन चे सचिव चरणजित सिंग सांघा, राजकुमार मालानी, अमोघ जैन, सराबज्योत यांनी त्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला.

श्री. भरत यांनी यापूर्वी त्यांनी 8 ते 14 नोव्हेंबर दरम्यान औरंगाबाद जिल्हा सायकलिंग असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या सोलो सायकलिंग राईड या उपक्रमां- मध्ये 7 दिवसांमध्ये 717 किलोमीटर अंतर सायकलिंग पूर्ण केले होते. या स्पर्धेतसुद्धा त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान रॉयल रायडर्स ने 7 दिवसीय दिव्यांग सप्ताह व्हर्च्युअल राइडचे आयोजन केले होते. कोणीही, कुठेही सकाळी 5.30 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सायकल राईड करावी व सायकलिंगचा निखळ आनंद घ्यावा, हा या राइडच्या आयोजनाचा उद्देश होता. राज्यभरातून विविध भागातील 150 पेक्षा जास्त रायडर्सने यात सहभाग घेतला. अनेक नवीन रायडर्सची यामुळे ओळख झाली व चर्चा करता आली, असे रॉयल रायडर्सचे आयोजक डॉ. आबा पाटील यांनी सांगितले. राईड संबंधित तांत्रिक बाबीमध्ये डॉ. प्रभाकर गायखे यांनी मोलाची भूमिका बजावली. नुकताच रॉयल रायडर्स यांच्यातर्फे दिव्यांग राईड चा अंतिम निकाल खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आहे 1) भरत झंवर, अहमदनगर – 1221 किलोमीटर 2) शांताराम पगारे, नासिक – 1116 किलोमीटर 3) पांडुरंग माने, सोलापूर – 778 किलोमीटर रॉयल रायडर्सचे डॉ. आबा पाटील यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा