मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज सुंता म्हणजे काय?

सुंता हा शब्द आपल्यापैकी सर्वांनाच माहिती असेल. विशेषतः जर आपल्याला मुस्लिम शेजारी वा मित्र असतील त्यांच्याकडून केव्हातरी ह्याबाबत ऐकायला मिळते. मुस्लिम समाजात एक धार्मिक विधी म्हणून सुंता केली जाते. ती सर्वच मुलांमध्ये होते. परंतु काही वैद्यकीय कारणांसाठी कोणाचाही सुंता करावी लागते. काही मुलांमध्ये लघवी बाहेर येण्याचे छिद्र खूप बारीक असते. त्यामुळे लघवी बाहेर पडण्यास अडचण होते. कधी कधी लघवी शिश्‍नातच साठून त्वचा सुजल्यासारखी होते. शस्त्रक्रिया करून हे छिद्र मोठे करता येते. त्यासाठी शिस्नाच्या त्वचेचा काही भाग काढून टाकतात. काहीजणांच्या बाबतीत खोबरेल तेल कोमट करून शिस्नाच्या टोकाला लावून व त्वचा नंतर थोडी थोडी मागे सरकावून (दिवसातून 4-5 वेळा) लघवीला जागा करून देता येते.

शल्यचिकित्सक शिस्नाच्या जवळच्या भागात भूल देऊन वा लहान मुलांच्या बाबतीत संपूर्ण भूल (General Anaesthesia)  देऊन शिस्नाच्या पुढच्या भागातील त्वचा काढून टाकतात. त्यामुळे लघवी जाण्याचा मार्ग मोकळा होतोच, परंतु वाढत्या वयाबरोबर येणार्‍या लैंगिक संबंधांतील अडचणीही दूर होतात. जन्म झाल्यावर लगेच सुंता केल्यास शिस्नाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी होते, अशी वैद्यकशास्त्रात नोंद आहे. मुस्लिम धर्मात सुंता धार्मिक विधी म्हणून करतात. त्याबाबतीत एक सांगावेसे वाटते, ते म्हणजे, शक्यतो सुंता तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच करून घ्यावी. तज्ज्ञ डॉक्टर निर्जंतुक केलेली आयुधे वापरतात. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर होणारा जंतुसंसर्ग व इतर गंभीर गुंतागुंती टाळता येतात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा