दूषित पाणी पुरवठ्याबाबत अधिकार्‍यांना महिलांचे निवेदन

अहमदनगर – भिंगार वॉर्ड नं.4 मधील रंगारगल्ली, सोनसळे गल्ली येथील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत कॅन्टोमेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना दुषित पाणी दाखवून त्यांच्याशी नागरिकांनी चर्चा केली. याप्रसंगी कॅन्टों.बोर्ड उपाध्यक्ष वसंत राठोड, अनिता वाघंबुरे, वैशाली कटोरे, शोभा कवेकर, विद्या बारटक्के, साधना कटोरे, सुनिता गोटे, सुरेखा निरवणे, वर्षा सोनसळे, संगीता बारटक्के, संतोष हजारे, राकेश भाकरे, बाळासाहेब कवेकर, सुनिल वराडे, विनय वराडे, राजेंद्र वराडे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी वैशाली कटोरे म्हणाल्या, गेल्या काही दिवसांपासून आमच्या रंगारगल्ली, सोनसळे भागात पिण्याचे पाणी दुषित येत असून, याबाबत संबंधित कर्मचार्‍यांना सांगूनही त्यात काहीही सुधारणा झालेली नाही व दुषित पाणी येतच आहे. या दुषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, त्यामुळे गॅस्ट्रो, काविळ, डेंगू अशा विविध आजारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या भागातील पाणी पुरवठा स्वच्छ व्हावा, अशी मागणी यावेळी मुख्य अधिकारी विद्याधर पवार यांच्याकडे केली. यावेळी अनिता वाघुंबरे म्हणाल्या, दुषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या ठिकाणच्या पाईपलाईन जुन्या झाल्याने त्या वारंवार फुटतात, त्यातून ड्रेनेजचे पाणीही जात असल्याने दुषित पाणी पुरवठा होत आहे. तरी बोर्डाने याबाबत तातडीने उपाययोजना करुन नागरिकांना स्वच्छ पाणी द्यावे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन याबाबत संबंधितांना सूचना देऊन स्वच्छ पाणी पुरवठा करु, असे आश्वासन दिले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा