1 जानेवारीपासून होणार्‍या दरवाढी पत्रकाचे अनावरण-पीठ गिरणी संघटनेच्या नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार

अहमदनगर- नूतन पीठ गिरणी संघटनेच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार दत्त मंदिर पाईपलाईन रोड येथे बाबासाहेब ढवण, लहानु तागड़, शंकर म्हस्के व राजन भागवत यांच्यावतीने करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीठ गिरणी संघटनेचे नव निर्वाचित अध्यक्ष रामकिसन सुपेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शेख मुश्ताक़ हे होते. या प्रसंगी सर्वश्री मुरलीधर फणसे, प्रकाश दहीफळे, नवनाथ बारस्कर, अल्ताफ़ शेख यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी रामकिसन सुपेकर, अरुण गिरम, चंद्रकांत ताठे, बजरंग गव्हाणे, समीर पठाण, भुजबळ मेजर, हाजी जमीर शेख, शंकर म्हस्के, गणेश अडसरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेच्या नूतन दरपत्रकाचे प्रकाशन पदाधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी हाजी जमीर म्हणाले, जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून पीठ गिरणी व्यवसायास अत्यावश्यक सेवेचा दर्जा देण्यासाठी मागणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अवैधरित्या पीठ गिरणीचा व्यवसाय करणारांवर संघटना कारवाई करणार आहे, याबाबत वीज वितरण कंपनीचेही सहकार्य घेण्यात येईल. रामकिसन सुपेकर म्हणाले, सर्व गिरणी चालक व मालक यांनी एक होवून संघटनेसाठी काम करावे कोणीही संघटनेने ठरविलेल्या भावापेक्षा कमी भावात दळण दळून देवू नये. संघटनेच्या नियमांचे पालन केल्यास सर्वांची प्रगती होईल. आजच्या सत्कारामुळे आम्हास काम करण्यास प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले. संघटनेचे ज्येष्ठ सभासद संजय भागवत व विनायक भाकरे यांनी मागील पस्तीस वर्षे संघटनेची सेवा केल्याबद्दल त्यांचाही सत्कार अलकाबाई तागड़ व सुभाष कसबे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर म्हस्के यांनी केले तर प्रस्ताविक अबरार शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी फय्याज मुलानी, जावेद पठाण, सचिन साठे, निलेश वारे, कमलाकर मेहेत्रे यांनी प्रयत्न केले. धनेश्वर पाठक यांनी सर्वांचे आभार मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा