खून, दरोड्यासह महिलांचे दागिने लुटल्याचे 17 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार एलसीबीकडून जेरबंद

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक, पुणे या जिल्ह्यातील आठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 17 गंभीर गुन्हे दाखल असलेला राजेंद्र उर्फ पप्पू भीमा चव्हाण (वय 26, रा. बेलापूर ता. श्रीरामपूर) या गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या सूचनेनुसार नाशिक परिक्षेत्रात फरार गुन्हेगारांना शोधून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत, त्या अनुशंगाने नगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विविध पथके गंभीर गुन्हे दाखल असलेले फरार आरोपी शोधत असून या मोहिमेत तब्बल 17 गंभीर गुन्हे दाखल असलेला राजेंद्र उर्फ पप्पू चव्हाण ला जेरबंद करण्यात गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.

लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपी राजेंद्र उर्फ पप्पू भीमा चव्हाण हा आपल्या बेलापूर या गावी असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती त्यानुसार शाखेचे एक पथक पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, संपत खंडागळे, पो. हे. कॉन्स्टेबल बापू फुलाने, पो. नाईक भिमराज खडसे, देवेंद्र शेलार, उमाकांत गावडे यांनी बेलापूर येथे जात सराईत गुन्हेगार चव्हाणला ताब्यात घेत लोणी पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित गुन्ह्यात हजर करून त्याला अटक करण्यात आली. पोलिस रेकॉर्डवर राजेंद्र उर्फ पप्पू भीमा चव्हाण याच्यावर तब्बल 17 गुन्हे दाखल आहेत. बहुतांशी गुन्हे महिलांच्या गळ्यातील दागिने लुबाडणे या पद्धतीचे आहेत. नगर जिल्ह्यासह नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव आदी तालुक्यांमध्ये हे गुन्हे घडलेले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा