अहमदनगरमध्ये 26 डिसेंबरला राज्यस्तरीय पद्मशाली उपवधू-वर परिचय मेळावा

अहमदनगर – अहमदनगर पद्मशाली वधू-वर मंडळ व समस्त पद्मशाली समाज, अहमदनगर यांच्यावतीने 26 डिसेंबर रोजी स. 9 ते सायं. 5 पर्यंत श्री मार्कंडेय संकुल, दातरंगे मळा, नगर येथे राज्यस्तरीय अहमदनगर पद्मशाली उपवधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आले आहे. असे नुकत्याच झालेल्या मीटिंगमध्ये जाहीर करण्यात आले. काळाजी गरज ओळखून, सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन समाज बांधवांचा वेळ, पैसा, परिश्रम वाचवण्याच्या दृष्टीने विवाह योग्य मुला-मुलींना योग्य स्थळ मिळवून देण्यासाठी पालकांची चिंता लक्षात घेऊन एकाच व्यसपीठावर एकाच दिवशी शेकडो उपवधु-वरांचा परिचय व्हावा हा सामाजिक दृष्टीकोन समोर ठेवून अहमदनगर समस्त पद्मशाली समाजच्यावतीने उपवधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. उपवधु-वरांची नाव नोदणी, नोंदणी प्रमुखांकडे करुन तसेच मेळावास्थळी उपस्थित राहून आपण वधू-वरांचा परिचय करुन द्यावा, असे आवाहन पद्मशाली समाजाच्यावतीने करण्यात आले.

हा उपवधु-वर मेळावा रघुनाथ गाजेंगी, रमेश भुस्सा, शिवाजी संदुपटला, कुमार आडेप, शंकर नक्का, भिमराज कोडम, कृष्णा संभार, नरेश सादुल, रमेश बोगा यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या मेळावा यशस्वीतेसाठी ऋषिकेश गुंडला, अयज म्याना, शंकर जिंदम, विनोद बोगा, दिपक गुंडू, दत्तात्रय जोग, निलेश मुदिगोंडा, श्रीनिवास इप्पलपेल्ली, रवी दंडी, सौ.सुरेखा आडम, दिंगबर कोंडा, लक्ष्मण रोल्ला, नाना मादास आदी परिश्रम घेत आहेत. इच्छुक पालकांनी 9325100148 या व्हॉट्सऍप नंबरवर उपवधू-वरांचा बायोडाटा पाठवावे. या मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी नोंदणी फी 200 भरावे लागणार आहेत. नोंदणी फी रक्कम पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट 9325100148 या व्हॉट्सऍप नंबरवर पाठवावे. किंवा श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान, गांधी मैदान, अ.नगर मो.नं.9860345659/ 9890100879, किंवा क्लासिक फोटो स्टुडिओ, दिल्लीगेट, अ.नगर मो.नं.9325100148. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्वांनी प्रशासनाचे नियम पाळावे व मेळाव्यास उपस्थितांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन आयोजक उपवधू-वर मंडळाकडून करण्यात आले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा